सहा. आयुक्त, जिल्हा मत्सव्यवसाय कार्यालय,
प्रशासकीय इमारत, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ
 

जिल्ह्यात खालील प्रमाणे योजना राबविल्या जातात -

१) मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना :-

या योजने अंतर्गत जिल्ह्यात सायखेडा, पूस, इसापूर येथे मत्स्यबीज उत्पादन केंद्र कार्यरत आहेत. अरुणावती व बेंबळा येथे नवीन चायनीज हॅचरीसह मत्स्यबीज उत्पादन केंद्राचे अनुक्रमे रु. ४.८३ व रु. ४.९४ असे एकूण ९.७७ कोटीचे बांधकाम प्रस्तावित आहे.

२) अवरुद्ध पाण्यात मत्स्य संवर्धन :

या योजने अंतर्गत पाटबंधारे विभागाचे नवीन तलावात खात्या मार्फत मत्स्यबीज संचयन करण्यात येते. सन २०११-१२ साठी बिगर आदिवासी योजनेत रु. १ लाख तरतूद मंजूर आहे. त्यातून सालोड व कोलंबी या नवीन तलावात २.६२ लाख मत्स्य बोतुकली संचयन करण्यात आले.

३) मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य :

या योजनेत मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांच्या सभासदांना मासेमारी साधने जसे नायलॉन सुत / जाळे व मासेमारी बिगर यांत्रिक नौका खरेदीवर ५०% (रु. ३०००/- च्या मर्यादेत) अनुदान देण्यात येते.

४) मत्स्य संवर्धन विकास यंत्रणा :

सदर योजना केंद्र पुरस्कृत असून केंद्र शासनाचा ७५% हिस्सा व राज्य शासनाचा २५% हिस्सा या प्रमाणे या योजनेत तरतूद देण्यात येते. ० ते ५ या वर्गवारीत बारमाही तलाव निवडण्यात येवून तलावात सोडलेल्या मत्स्यबीज व निविष्ठा खर्चावर २०% अनुदान देण्यात येते. तसेच मत्स्य कास्तकारांना मत्स्यतळी बांधण्यासाठी रु. ६०,०००/- प्रती हेक्टरी मर्यादेत अनुदान देण्यात येते. अनु. जाती / जमाती करिता २५% अनुदान रु. ७५,०००/- मर्यादेत देण्यात येते.

५) मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचा विकास :

सदर योजने अंतर्गत नवीन मच्छिमार सहकारी संस्थांना संस्थेच्या भागभांडवलाच्या तिप्पट रु. १०,०००/- च्या मर्यादेत भाग भांडवल मंजूर केली जाते. भाग भांडवलाची परतफेड संस्थेनी सहाव्या वर्षापासून समान १० हप्त्यात १० वर्षात करावयाची आहे.

इतर योजना

१) राष्ट्रीय कल्याण निधी योजना (घरकुल योजना) :

या योजने अंतर्गत क्रियाशील मच्छिमारांसाठी राष्ट्रीय कल्याण निधी या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत मच्छिमारांसाठी घरकुल, पिण्याचे पाणी, समाज मंदिर, इत्यादी कल्याणकारी मुलभूत सुविधा उपलब्द करून देण्याची तरतूद आहे.

या योजने मध्ये राज्य शासन कडून शिफारस करण्यात आलेल्या प्रस्तावाची केंद्र सरकार तर्फे छाननी करण्यात येवून प्रस्तावास मंजुरी देण्यात येते. प्रत्येक घरकुल ३५ चौरस मीटर आकाराचे असून त्यमध्ये बैठक खोली, स्वयंपाक गृह व संडास बाथरूम इत्यादी बांधण्यात येतात. २५ घरकुल्याच्या समूहाला एक कूप नलिका व ७५ घरांच्या एका समूहाला एक समाज मंदिर देखील बांधून देण्यात येते. एका घरकुला साठी शासन रु. ५०,०००/- एवढे अर्थसाहाय्य / अनुदान देते. घरकुल बांधकामासाठी रु. ५०,०००/- पेक्षा जास्त खर्च येत असल्यास लाभार्थीने स्वतः किंवा संबधित मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेने सदर खर्चाचा भर उचलणे अपेक्षित आहे.

२) राष्ट्रीय मत्स्यकी विकास बोर्ड (NFDB) :

भूजलाशयीन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जलाशय व तलाव उपलब्द आहेत. परंतु त्यातील मिळणारे मत्स्य उत्पादन व उत्पन्न नगण्य आहे. इष्टत्तम मत्स्यबीज संचयनाचा अभाव यामुळे उत्पादनावर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे इष्टतम मत्स्यबीज संचयन करून जल क्षेत्राच्या क्षमतेनुसार उत्पादकता वाढविणे व पर्यायाने मच्छिमारांची उन्नती साधने या दृष्टीने राष्ट्रीय मत्स्यकी विकास बोर्ड यांच्या सहाय्याने जलाशयावर मत्स्य व्यवसाय विकासाची योजना सन २०१०-११ पासून राबविण्यात येते.

३) मा. पंतप्रधान पॅकेज कार्यक्रम :

विदर्भातील शेतक-यांना आत्महत्त्या करण्या पासून परावृत्त करण्यासाठी मा. पंतप्रधान पॅकेज कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या योजने अंतर्गत विदर्भातील ६ जिल्ह्यातील शेतक–यांना साहाय्य म्हणून मत्स्यतळी बांधकाम व निविष्ठा खर्चावरील अनुदान देण्यात येते. मत्स्यतळी खोदकामासाठी प्रती हेक्टर रु. ३ लाख व निविष्ठासाठी रु. ५०,०००/- खर्च मर्यादा असून त्यावर सर्वसाधारण लाभार्थींना ४० टक्के व अनु. जाती – जमातीच्या लाभार्थींना ५० टक्के अनुदान देय आहे. ज्या शेतक–याकडे मुबलक पाण्याची व्यवस्था आहे अशा शेतक–यांनी त्यांचे शेतात मत्स्यतळी खोदकाम करून खेतीला पूरक व्यवसाय उपलब्द करावा.

४) शेतक–यांच्या शेतामध्ये मृद व जल संधारणाच्या उद्देशाने कृषी विभागाकडून शेततळी तयार करण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात आला. शेततळयामुळे उपलब्द झालेल्या जलक्षेत्रात ग्रामीण भागात रोजगारांच्या संधी उपलब्द होणे या हेतूने शेततळयात मत्स्य संवर्धनासाठी प्रोत्साहन हि नवीन योजना शासनाने मंजूर केली आहे. या योजनेत निवडलेल्या लाभार्थीस ०.१० हेक्टर जल क्षेत्रासाठी रु. १०,०००/- निविष्ठा खर्च मर्यादे पर्यंत ५०% अनुदान रु. ५०००/- प्रथम वर्षी अनुज्ञेय आहे. त्याच लाभार्थीस दुस-या वर्षी २५% अनुदान रु. २५००/- अनुज्ञेय आहे.

दृष्टीक्षेपात (२०१२-१३) जानेवारी २०१३ अखेर
१) जलक्षेत्र :-
अ) तलाव
तलावाची मालकी तलाव संख्या सरासरी जलक्षेत्र (हे.) इष्टतम मत्स्य बोतुकली संचयन (लाख) अपेक्षित मत्स्योत्पादन (मे.टन)
पाटबंधारे तलाव ९६ २२११९ २०५.०८ ६१४६.२५
जिल्हा परिषद तलाव ३३४ २१६१ १०८.०५ ३२४१.५०
स्थानिक स्तर १३ २१० १०.५० ३१५.००
नगर परिषद ०३ २८ १.४० ४२.००
खाजगी ३८ २१ १.०५ ३१.५०
एकुण ४८४ २४५१२ ३२६.०८ ९७७६.२५
ब) नद्यांची लांबी - १६०० कि.मी.
२) मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था -
  • संस्था संख्या - १८१

  • सभासद संख्या - ६१७१

  • कार्यरत संस्था संख्या - १६७

  • जिल्हा मत्स्य.सह.संघ - ०१ (यवतमाळ)

  • सभासद संख्या - -

३) मत्स्यबीज उत्पादन केंद्र - उर्ध्व पैनगंगा (ईसापुर)
४) मत्स्यबीज संवर्धन केंद्र - सायखेडा ता.पांढरकवडा व पुस ता.पुसद
५) मत्स्यबीज संचयन (लाख) -
सन २००८-०९ सन २००९-१० सन २०१०-११ सन २०११-१२ सन २०१२-१३
लक्ष्य २१२ २६२ २६२ २६२ २६२
साध्य २१२ २०८.५७ २२५.५० २४९ २५३.१२
६) मत्स्योत्पादन (मे.टन) :-
सन २००८-०९ सन २००९-१० सन २०१०-११ सन २०११-१२ सन २०१२-१३
उद्दिष्ट ४६१२ ४७०० ४९०० ५१०० ५१००
साध्य ३४६३ ३२२३ ३७३५ ४५५५ २८७० (जाने-१३ अखेर)
७) मत्स्यबीज उत्पादन :-
(७.१) केंद्रनिहाय मत्स्यजीरे संचयन (लाख) :-
वर्ष इसापुर सायखेडा पुस एकुण
२००८-०९ ४१.०० २४.०० -- ६५.००
२००९-१० ४६.०० २७.०० १०.०० ८३.००
२०१०-११ -- २०.०० २०.०० ४०.००
२०११-१२ -- ६०.०० ४०.०० १००.००
२०१२-१३ ३६.५० ४०.०० १५.०० ९१.५०
(७.२) केंद्रनिहाय मत्स्यबीज उत्पादन (लाख) :- माहे जानेवारी २०१३ अखेर
वर्ष इसापुर सायखेडा पुस एकुण
२००८-०९ २१.२९ ७.०३ -- २८.३२
२००९-१० ६४.५० ७.८९ १.९२ ७४.३१
२०१०-११ ८०.८० १.५२ ४.३० ८६.६२
२०११-१२ ६४.५४ ११.४९ १०.३७ ८६.४०
२०१२-१३ ४८.१० १२.८० -- ६०.९०
(७.३) मत्स्यजीरे उत्पादन :-
राष्ट्रीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र उर्ध्व पैनगंगा (ईसापुर):-
वर्ष उद्दिष्ट (लाख) साध्य (लाख)
२००८-०९ - २९८.००
२००९-१० १००.०० २४४.००
२०१०-११ १००.०० २८०.००
२०११-१२ १००.०० ३०३.००
२०१२-१३ १००.०० १७१.००
(७.४) मत्स्यबीज विक्रीपासुन महसुली उत्पन्न :- रुपये लाखात:-
वर्ष इसापुर सायखेडा पुस एकुण (रुपये)
२००८-०९ ३.९९ १.१२५ -- ५.११
२००९-१० ३.०८ ०.९७५ ०.२७ ४.०५५
२०१०-११ ४.५९ ०.२६५ ०.९०३ ५.७५
२०११-१२ ४.०८ २.३२ १.६० ८.००
२०१२-१३ २.१८ २.५७ -- ४.७५
८) तलाव ठेका पासुन महसुल उत्पन्न (रुपये) :-
वर्ष उद्दिष्ट (लाख)
२००८-०९ २१,९३,९४४/-
२००९-१० २५,१३,८९६/-
२०१०-११ १९,३७,२६१/-
२०११-१२ २३,५२,३३४/-
२०१२-१३ २४,९६,१३७/-
९) योजनाअंतर्गत योजना :-
योजना सन २०१०-११ सन २०११-१२ सन २०१२-१३
तरतूद (रु. लाख) तरतूद (रु. लाख) तरतूद (रु. लाख) तरतूद (रु. लाख) तरतूद (रु. लाख) तरतूद (रु. लाख)
१. सर्व साधारण सेवा ९.५० ९.५० ७.०० ७.०० २०४.७२ २०४.७२
२. आदिवासी उपाययोजना १.२४ १.२४ १.७० १.७० २.०० १.०६
३. आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना ०.४० ०.४० ०.४३ ०.४३ ०.४० ०.१३
४. अनुसूचित जाती उपाययोजना -- -- -- -- -- --
एकूण राज्य हिस्सा ११.१४ ११.१४ ९.१३ ९.१३ २०७.१२ २०४.७३
एकूण केंद्र हिस्सा १.४० १.४० -- -- -- --
एकूण बेरीज १२.५४ १२.५४ ९.१३ ९.१३ २०७.१२ २०४.७३
(१०) राष्ट्रीय मत्स्यकी विकास बोर्ड (NFDB):-
जलाशय विकास प्रकल्प योजना सन २०१०-११ सन २०११-१२ सन २०१२-१३
१०.१) विकसित तलाव संख्या/जलक्षेत्र हेक्टर ०२/१४०० -- --
१०.२) प्रस्तावित म.बोटुकली संचयन (लाख) २८.०० -- --
१०.३) प्रत्यक्ष म.बोटु संचयन (लाख) १८.६० -- --
१०.४) म.बोटु.संचयनावर मंजुर अनुदान (लाख) १४.०० -- --
१०.५) प्रत्यक्ष वितरित अनुदान रुपये १४.०० -- --
प्रशिक्षण : प्रशिक्षणार्थी संख्या लक्ष्य -३०
१०.६) प्रशिक्षणार्थी संख्या (साध्य) ३० -- --
१०.७) प्रशिक्षणाचा एकुण खर्च रुपये २३२६४/- -- --
११) मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणा :-
सन २०१०-११ सन २०११-१२ सन २०१२-१३
लक्ष्य साध्य लक्ष्य साध्य लक्ष्य साध्य
१. निविष्ठा (हेक्टर) १०० ८९.६७ -- -- -- --
२. मत्स्यतळी बांधकाम (हेक्टर) २.०० -- -- -- -- --
३. मत्स्योत्पादन मे. टन १५० १२० -- -- -- --
४. योजना खर्च - राज्य हिस्सा -- ०.५० -- -- -- --
केंद्र हिस्सा -- १.४० -- -- -- --
एकूण -- १.९० -- -- -- --