कृषिसंस्कृतिचे दर्शन घडविणारी ‘यात्रा पश्चिमालाप’
  

            कुठल्याही देशाचा वा राज्याचा सांस्कृतिक वारसा, कला, साहित्य ही त्या राज्याची स्वतंञ ओळख निर्माण करणारी असून यातून वैभव संपन्न राज्याची निर्मिती होते. राजे महाराजे यांच्या काळात कलेला राजाश्रय मिळत असल्याने एका राज्याची संस्कृती विविध राज्यात बहरत होती. माञ, आज हीच संस्कृती, कला, साहित्य् यांना एका मेण्यात बसविण्या‍चे काम राजस्थान राज्यातील उदयपूर जिल्हृयातील ‘पश्चिम क्षेञ सांस्कृ‍तिक केंद्र’ करीत आहे. या केंद्राकडून ‘याञा पश्चिमालाप’ या कार्यक्रमातून देशातील पश्चिम क्षेञातील राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या चार राज्यांना एकञ आणून आपली सांस्कृीतिक, कलावैभव, कृषिसंस्कृती या वैभव संपन्न कलेचा प्रसार आणि प्रचार करून काळाच्या ओघात लुप्त होत चालली संस्कृती जीवंत ठेवण्याचे काम करीत आहे.

            बळीराजा चेतना अभियान अंतर्गत शेतक-यांना, समाजातील सर्वच घटकांना आपली भारतीय, महाराष्ट्रीय, गोवा, राजस्थान, गुजरात येथील कृषिसंस्कृतिचा परिचय व्हावा. या सांस्कृतिक मुल्यांच्या माध्यमातून शेतक-यांना जागृत करण्याकरिता याञा पश्चिमालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरवात यवतमाळ येथील पोस्टल ग्राउंडवर पालकमंञी संजय राठोड, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून २८ फेबु्वारीला करण्यात आले. तर प्रत्येक तालुक्यात दररोज हा कार्यक्रम शेतक-यांसाठी निशुःल्क आयोजित करण्यात आला.

            कृषीसंस्कृती ही भारतीय संस्कृतीचा पाया असल्याने कृषी संस्कृतीवरच आधारीत प्रत्ये्क राज्याने त्या कृषी हंगामातील नृत्यांचे बहारदार सादरिकरण केले. या कार्यक्रमातून भारतीय कृषि संस्कृ्तीचे प्रतिबिंब उमटल्यांच्या प्रतिक्रियाही बघावयास मिळत आहे. इतकेच नव्हे तर संस्कृतीचा आधार घेत शेतक-यांना मनोरंजनाच्याच माध्यमातून आपली कृषिसंस्कृती जीवंत ठेवण्यासाठी या ‘याञा पश्चिपामाला’ असल्याबचे खुदद शेतकरी आता बोलू लागले आहे. दिवसभर शेतात काम केल्यानंतर शेतक-यांना राञीच्या वेळी विरंगुळा म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून सहपरिवार बसून कार्यक्रम पाहत असल्याने त्यांचे मनोबल उंचावत आहे.

            महाराष्ट्रारतील भक्ती रसाने ओथंबलेला विशेष कलाप्रकार म्हाणजे ‘भारूड’ होय. यासोबतच भक्तीपर गायन, विनोदी काव्य रचना यांचे सादरीकरण शाहिर अनंतकुमार साळुंखे यांनी करून थेट शेतक-यांच्यात मनावर अधीराज्य केले. तर प्रमोद कांदलकर यांनी कृषि आधारीत गाण्यासोबत ‘लोकप्रिय नृत्य’ प्रकाराचे सादरीकरण केले. तर वीररसाने भरलेल्या ‘पोवाडा’या महाराष्ट्रातील विशिष्ट असा गायन प्रकार सादर करण्यानत आला. थोर वीर पुरूषांचे चरिञ पोवाडयाच्याव माध्ययमातून युवापिढीला संस्कारक्षम बनविण्याकरिता पोवाडयांचे सादरिकरण महत्वाचे ठरले.

            राजस्थान राज्यातील रोमांचकारी नृत्य प्रकाराचे ज्यात महिला व पुरूष डोक्यावर आठ ते दहा घागरी ठेउन आपल्या कृषिसंस्कृातिचे दर्शन घडविले. यामध्ये उदयपूर जिल्हयातील गोगुंदा तालुक्यातील सुरेशदास आणि कला संचाने सादरिकरण केले. यामध्येू ‘भवाई, तेराताल, कालबेलिया, घुमर, चरी’ या नृत्य् प्रकाराचे सादरीकरण करण्यात आले.

            गोवा राज्याने आपल्या संस्कृतीची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रालगत असून त्यांनी आपला सांस्कृतिक वारसा जतन करून ठेवला अशाच कलेचे सादरिकरण ‘जागर, धनगरी नृत्य, समई नृत्य’ याचे बहारदार प्रदर्शन उमाकांत करमरकर आणि त्यांच्या कला चमू कडून करण्यात येत आहे.

            गुजरात या राज्यातील किशनगढ क्षेञातील गुजर महिलांचे प्रसिद्ध नृत्य ‘चरी’यातून महिला आपल्या डोक्यावर घागर घेउन त्यात अग्नी प्रज्वलित करून ढोल व थाली यांचे साथीने नृत्याचे सादरीकरन करतात. ‘करवानो वेश’ यात कलाकार आपल्या भोवताली चक्कर मारून साडी पासून मोर, ससा, कबूतर बनवितो. ‘डांग’ यामध्येो महाराष्ट्रच्या सिमावर्ती भागातील पारंपारीक गतीमान नृत्य् प्रकार असून सण, उत्सवांच्या कालावधीत याचे सादरिकरण करण्यात येते. यातील कलाकारा मध्ये अहमदाबाद येथील भरतभाई रावल, गणेशभाई गावित यांनी सादरिकरण केले.

            पश्चिमालाप कार्यक्रमातून महाराष्ट्रातील पोवाडा, भारूड, लावणी, गुजरा मधील राठवा नृत्य, गोवा राज्यातील समई नृत्य, धनगरी नृत्य, जागर, राजस्थान राज्यातील घुमर, भवाई, तेराताल, कालबेलिया, गुजरात राज्यातील केरवानो केश, डांग या राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन राष्ट्रीय व आंतराष्ट्री्य पातळी वरील कलाकारांनी शेतक-यांना घडविले. पश्चिम क्षेञ सांस्कृ्तिक केंद्र व्दारे ‘याञा पश्चिपाला’ कार्यक्रम ही परीकल्पाना १९८८ मध्यें केंद्र शासने अस्थित्वालक त आणल्या गेली असून पश्चिमक्षेञ सांस्कृतिक केंद्राचे कार्यक्रम अधिकारी राकेश मेहता यवतमाळ जिल्हषयात कृषिसंस्कृतिचा प्रचार-प्रसार करीत आहे.

            सोळाही तालुक्यात कार्यक्रम - पश्चिमालाप कार्यक्रम जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात सादर होणार आहे. 1 मार्च रोजी बाभुळगाव, 2 मार्च कळंब, 3 मार्च राळेगाव, 4 मार्च आर्णी, 5 मार्च घाटंजी, 6 मार्च दारव्हा, 7 मार्च पुसद, 8 मार्च दिग्रस, 9 मार्च उमरखेड, 10 मार्च महागाव, 11 मार्च केळापूर, 12 मार्च झरी जामणी, 13 मार्च वणी, 14 मार्च मारेगाव येथे हा कार्यक्रम होणार असून तो नागरिकांसाठी निशु:ल्क राहणार आहे.