कार्यकारी अभियंता, जलसिंचन विभाग , जिल्हा परिषद, यवतमाळ
कार्ये – ० ते १०० हेक्टर मधील लघु सिंचनाची कामे

जल सिंचन विभाग, जिल्हा परिषद हे कार्यालय अधीक्षक अभियंता, लघु सिंचन (स्थानिक स्तर) मंडळ अमरावती व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांचे प्रशासकीय नियंत्रण व सल्ल्याने काम करते. या विभागाखाली जि.प. कडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर १ ते १०० हेक्टर लघु सिंचनाची कामे केल्या जातात.

कामांचे प्रकार

  • जलसिंचन तलाव
  • पाझर तलाव
  • गावातील छोटे तलाव
  • जल संचय तलाव
  • कोल्हापुरी बंधारे

अ)जलसिंचन टाक्या

जलसिंचन तलाव म्हणजे जमिनीवरील पाणी साठविल्या गेलेले तलाव किंवा छोटे धरणे व ज्यांची १ ते १०० हेक्टर सिंचन क्षेत्र तयार करण्याची क्षमता आहे. कालवे बांधून जल सिंचन साध्य होऊ शकते व सिंचन क्षेत्रात येणा-या शेतक-यांना त्यामुळे पिका साठी पाणी उपलब्द होऊ शकते. मुख्य जलसिंचन हे खरीप व रबी हंगामात होते व हे प्रत्यक्ष कालवा पद्धतीद्वारे होते.

ब)पाझर तलाव

हे सुद्धा जमिनीवर तयार होणारे तलाव किवा धरणे होय ज्यामुळे अप्रत्यक्ष जलसिंचन हे १०० हेक्टर च्या आत होऊ शकते. धारणा खालील क्षेत्र असलेले शेतकरी सिंचना करिता त्या क्षेत्रात उघड्या विहिरी करून पाणी मिळवू शकतात. मुख्य उद्देश हा जमिनी खालील पाण्याची पातळी वाढविणे हा आहे.

क)गावातील तलाव

हे सुद्धा जमिनीवर तयार होणारे तलाव असून याची जल संचयाची क्षमता ५ मी.क्यू.फी. पेक्षा कमी आहे. या मुळे जे पाणी साठल्या जाते त्याने गुरा-ढोरांना पाणी मिळते व पाण्याची उपलब्धता वाढते.

ड)जल संचय तलाव

जे तलाव पाझर तलावाचे फायदे देऊ शकत नाहीत परंतु ते पाणी साठवू शकतात. अशा तलावांना कालवे नसतात परंतु त्यांचे साठविले पाणी हे पंपाच्या सहायाने उपसता येते व जल सिंचना साठी वापरता येते.

ई)कोल्हापुरी बंधारे

हे मानव निर्मित बंधारे सिमेंट कॉन्क्रेट ने तयार केलेले असून नदी किवा नाल्यामध्ये आडवे असतात. या बंधा-यामुळे पावसाळ्या नंतर नदी-नाल्याच्या पाण्याचा प्रवाह रोखून पाणी साठविल्या जाते. या क्षेत्रातील (नदी/नाल्याच्या दोन्ही बाजूच्या) शेतक-यांना बंधा-यातील पाणी उपसण्या बाबत सल्ला देतात. मुख्य सिंचन हे रबी व इतर उन्हाळी हंगामा करिता असते.

कोल्हपुरी प्रकारचा बंधारा हा नदी /नाल्याचा मध्ये आडवा बांधतात. यात जलविसर्गासाठी २ मीटर रुंद आडवी जागा असते. १५ ऑक्टोबर नंतर प्रत्येक वर्षी बंधा-यात जलविसर्गाच्या ठिकाणी लोखंडी जाळ्या टाकून पाणी अडविल्या जाते. नंतर साचविलेले पाणी सिंचनासाठी उपसले जाते.