जिल्हा पशुधन विकास कार्यालय, जिल्हा परिषद, यवतमाळ
मुख्य उद्देश
 • दुभत्या जनावरांमध्ये कृत्रिम रेतन पद्धतीने अनुवंशिक सुधारणा
 • ग्रामीण भागामध्ये गरीब वर्गांच्या आर्थिक उन्नती व सामाजिक फायद्यासाठी दुध व मांस उपयोगासाठी संकरित जाती प्रजनन पद्धतीने कार्यक्षम शेळ्या व कुकुटपालन विकसित करणे.
 • पशुपैदास व व्यवस्थापना मधील सर्व घटकांवर आधारित विस्तार व संशोधन कार्यक्रम व विस्तार प्रशिक्षण घेणे
एकूण पशुधन
अ) संकरित गायी २१२१२
ब) प्रजननयुक्त संकरित गायी ८५९८
अ) देशी गायी ७९१५२०
ब) प्रजनन युक्त देशी गायी २५४६४५
अ) एकूण संकरित व देशी गायी ८१२७३२
ब) प्रजनन युक्त संकरित व देशी गायी २६३२४३
अ) एकूण म्हैस वर्गीय जनावरे १४०१५४
ब) प्रजनन युक्त म्हशी ८०८५१
एकूण मेंढ्या १०६००
एकूण शेळ्या ३९८८४८
अ)एकूण कोंबड्या ६३८८८६
ब)देशी कोंबड्या ६००९८१
क)सुधारित कोंबड्या ३७९०५
एकूण बदक ७२२
एकूण डुकर १३६९१
एकूण घोडे ११२७
एकूण गाढव ९३३
एकूण पशुधन २०१८६५२
उपलब्द पशुचीकीत्सालये (स्थानिक स्तर) - एकूण १४८
 • पशुचीकीत्सालये श्रेणी-१ - ५०
 • पशुचीकीत्सालये श्रेणी-२ - ९७
 • फिरते पशु संक्रमण पथक - ०१
पशु दवाख्यान्यात उपलब्द सुविधा
 • कृत्रिम बीजारोपण
 • लसीकरण
 • खच्चीकरण
 • शल्यचिकित्सा व प्रयोगशाळेतील तपासणी उपचार
 • वेगवेगळ्या योजने अंतर्गत प्रमाणपत्र देणे
 • पशुविकास कायदा राबविणे
 • चारा कार्यक्रम राबविणे
 • वेगवेगळ्या पशुसंवर्धन संबधित योजना राबविणे
कार्यालयीन कर्मचारी संख्या
पद मंजूर पदे कार्यरत रिक्त
जिल्हा.पशुसंवर्धन विकास अधिकारी --
पशुधन विकास अधिकारी ६६ ५६ १०
सहा.पशुधन विकास अधिकारी १६ ०९ ०७
पशुधन पर्यवेक्षक ११२ १०७ ०५
पट्टीबंधक ४४ २९ १५
मदतनीस १८९ १७४ १५
पशुधन विकासासाठी वेगवेगळ्या योजना
अ)टीएसपी व टीएसपी (एससीए) अंतर्गत नैसर्गिक कामाकरिता संकरित बैलांचा पुरवठा

संकरण अंतर्गत नैसर्गिक कामाकरिता संकरित बैलांचा पुरवठा जेथे आदिवासी गावामध्ये कृत्रिम बीजारोपण सुविधा शक्य नाही.

ब)टीएसपी (एससीए) / ओटीएसपी (एससीए) अंतर्गत दुभत्या जनावरांना चारा पुरवठा

सु व्यवस्थापन व दुधाचे प्रमाण वाढीसाठी पर्यायाने ग्रामीण भागातील जनतेचे आर्थिक पत वाढीसाठी निरनिराळ्या योजना अंतर्गत दुभत्या जनावरांना चारा पुरवठा

क)एमएडीए (एससीए) / कोलाम (एससीए) / एससीपी एससीएच अंतर्गत दुभते जनावरे व शेळ्या वाटप

स्वयंरोजगार करिता वेगवेगळ्या योजने अंतर्गत ग्रामीण गरीब लोकांना भते जनावरे व शेळ्या वाटप

ड)टीएसपी/ओटीएसपी/एससीपी अंतर्गत चारा विकास

दुध क्षमता व कार्यक्षम जनावराची पैदास वाढीसाठी लाभार्थ्याची हिरव्या चा-याची मागणी पूर्ण करण्यासाठी उच्च प्रतीच्या चा-याचे बी पुरविणे.

इ)भव्य प्रशिक्षण कार्यक्रम / वासरांच्या मिरवणुका / शिबिरे भरविणे

भव्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केल्यामुळे संकरण कार्यक्रमाची माहिती मिळते /विस्तारी योजनांची माहिती/जनावरांचे व्यवस्थापन व चालू काळातील पशुधन क्षेत्रातील संशोधनाबाबत माहिती मिळते. संकरित वासरांच्या मिरवणुकी मुळे लोकांमध्ये चांगल्या पद्धतीने काळजी व योग्य व्यवस्थापना बाबत स्पर्धा करता येते ज्यामुळे अधिक जनावर पैदास होण्यास मदत होते

फ) टीएसपी (एससीए) अंतर्गत आदिवासी स्त्रियांसाठी प्रवासीय प्रशिक्षण भरविणे

पशुधन संबधित गोष्टी जाणून घेण्यासाठी आदिवासी महिलांकरिता प्रवासीय प्रशिक्षण कार्यक्रम भरविणे