बाल विकास

या कार्यक्रमा अंतर्गत ० ते ६ वर्षा मधील बालके तसेच गरोदर माता व दाई माता यांना सर्व प्रकारची मुलभूत व अत्यावशक सेवा एकात्मिक पद्धतीने थेट त्यांच्या गाव किवा वार्डा पर्यंत पोहचविण्यात येते.

स्थानिक समुदाय स्तरावर मुले व माता करीतांच्या या सर्व सेवा राबविण्यासाठी अंगणवाडी हे केंद्रीय स्थानी असते. त्याकरिता अंगणवाडी कार्यकर्तीची भूमिका हा कार्यक्रम राबविण्यासाठी निर्णायक स्वरुपाची असते.

१९८२ मध्ये एकूण चार पंचायत समित्यांमध्ये हा कार्यक्रम सुरु करण्यात आला. हळूहळू उर्वरित ठिकाणे सुद्धा यामध्ये सामावले गेले. सध्या सर्व १४ योजना १६ ही पंचायत समित्यांमध्ये सुरु असून सर्व जिल्हा एकात्मिक बाल विकास योजने अंतर्गत समाविष्ट करण्यात आला.

योजनेचा उद्देश

एकात्मिक बाल विकास योजनेचा उद्देश खालील प्रमाणे सांगता येईल.

 • ० ते ६ वयोगटातील बालकांसाठी पोषकता व आरोग्या संबधी सुधारणा
 • मुलांच्या आवश्यक मानसिक, शारीरिक व सामाजिक विकासासाठी पायाभरणी
 • बाल मृत्युदर, कुपोषण व शाळा सोडण्याच्या घटना कमी करणे
 • निरनिराळ्या विभागांसोबत बाल विकासासाठी या योजना व त्या राबविण्याबाबत कार्यक्षम समन्वय आणणे
 • आवश्यक पोषण व आरोग्य शिक्षणाद्वारे बालकांचे सर्व साधारण आरोग्य व पोषकतेची गरज याची काळजी घेण्यासाठी मातांची क्षमता वाढविणे.

संपूर्ण सेवा

 • पुरवणी पोषण
 • आरोग्य तपासणी
 • गरोदर मातांकारिता धनुर्वात विरोधी लसीकरण
 • पोषण व आरोग्य शिक्षण
 • रेफरल सेवा
 • अनौपचारिक प्राथमिक शिक्षण

मंजूर व कार्यरत अंगणवाडी केंद्रे

(अ) नियमित - २०६९, (ब) लघु - २०

अस्थापना

मुख्य बाल विकास कार्यक्रम अधिकारी सहा. बाल विकास कार्यक्रम अधिकारी पर्यवेक्षक अंगणवाडी महिला कार्यकर्ती मदतनीस
मंजूर पदे १४ ०५ १०० २०६९ २०६९
कार्यरत १४ ०५ ८८ २०१२ २०१९
रिक्त पदे -- -- १२ ५७ ५०

लाभार्थी

अनु.क्र. लाभार्थी प्रकार सर्वेक्षण पुरवणी पोषणासाठी निवडलेले लाभार्थी
०६ महिने ते ०३ वर्षं १०८०६० ७९७५५
०३ वर्षे ते ०६ वर्षे ११००५३ ८९३९३
गरोदर माता २०७१४ १५८७३
दाई माता २१३१३ १६११

श्रेणी निहाय बालके

 • सर्व साधारण श्रेणी - ७३८७३
 • श्रेणी-१ - ८९००६
 • श्रेणी-२ - ५४०६१
 • श्रेणी-३ - १०५५
 • श्रेणी-४ - १३३

कुपोषित बालकांची टक्केवारी ०.५४

पुरवणी पोषण

 • स्थानिक अन्न - भात, वरण (डाळ), प्रथिने (कडधान्ये).
 • प्रती लाभार्थी प्रतीदिन प्रमाण – रुपये १.५०
 • बाल मृत्यूचे प्रमाण - २६ बालके प्रती हजार