कृषि विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, यवतमाळ
केंद्र पुरस्कृत ऊस विकास योजना

या योजने मध्ये , स्वतःचा ट्रॅक्टर व शेती असलेया ऊसाचे पिक घेऊ इच्छिना-या शेतक-याला २५-५०% अनुदान

राष्ट्रीय तेलबिया व डाळी विकास कार्यक्रम

तेलबियाचे पिक घेणा-या शेतक-या साठी हि योजना आहे. अनुदान मिळविण्यासाठी या योजनेमध्ये खालील गोष्टींचा यात अंतर्भाव केला आहे.

 • रोप सुरक्षा उपकरणे ५०% अनुदान स्वरुपात
 • तुषार सिंचन संच ५०% अनुदान स्वरुपात फक्त अनु.जाती, अनु.जमाती, अल्पभूधारक व महिला शेतक-यांसाठी तसेच ३३% अनुदान हे इतर शेतक-यांसाठी एक हेक्टर तुषार संच
 • तेल बियांचे उत्पन्न वाढविण्यासाठी जिप्सम प्रती मेट्रिक टन ५०० रुपये अनुदान उपलब्द.
 • बीज उपचार – थायरम पुरवठा ५०% अनुदान किवा १८ रुपये प्रती हेक्टर.
 • शेतीचा विकास – ५०% अनुदान वा १५०० रुपये प्रती शेत
 • रायझोबिअम पद्धती व पी.एस.बी. पॅकेट चा पुरवठा ५०% अनुदानाने.
 • बीज नमुने - वेगवेगळे बीज नमुने शेतक-यांना पुरविल्या जातात.
एकात्मिक धान्य विकास कार्यक्रम

या कार्यक्रमामध्ये अनुदान मिळविण्यासाठी खालील गोष्टींचा अंतर्भाव केला आहे.

 • शेतीचा विकास व रोप सुरक्षा ५०% अनुदान.
 • तुषार सिंचन संच ५०% अनुदान स्वरुपात फक्त अनु.जाती, अनु.जमाती, अल्पभूधारक व महिला शेतक-यांसाठी तसेच ३३% अनुदान हे इतर शेतक-यांसाठी एक हेक्टर तुषार संच.
 • बीज नमुने – उच्च प्रतीचे बीज नमुने अल्प किमतीत उपलब्द केल्या जातात.
एकात्मिक कापूस विकास कार्यक्रम

या कार्यक्रमा अंतर्गत रोप सुरक्षा उपकरणे ५०% अनुदान स्वरुपात उपलब्द केल्या जातात (पावर व हाताने वापरावयाचे फवारणी यंत्र).

अनु. जाती व नव बौद्ध शेतक-यांच्या विकासाठी योजना तसेच टीएसपी/ओटीएसपी/माडा/कोलाम शेतकरी यांच्या साठी सुद्धा योजना

दारिद्र्य रेषे खालील अनु. जाती व नव बौद्ध शेतक-यांच्या विकासाठी योजना. खालील वस्तू अनुदान स्वरुपात मिळू शकतात.

 • इनपुट किट्स चा पुरवठा
 • बैलजोडी व बैलगाडी पुरवठा
 • उच्च प्रतीचे शेतीला लागणारे अवजारे
 • बोरवेल व जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी
 • विद्दुत मोटर पंप, पाईपलाईन, इंधन तेलावर चालणारे इंजिन
 • नवीन विहीर खणणे

वरील योजना करिता एकूण ५०,००० रुपये प्रती लाभार्थी अनुदान स्वरुपात मिळते. गरजे नुसार फक्त बैलजोडी, बैलगाडी, पाईपलाईन व विहिरीची दुरुस्ती करिता ५०% अनुदान मिळते.

विदर्भ विकास कार्यक्रम
या कार्यक्रमा अंतर्गत खालील दोन योजना राबविल्या जातात.
 • विशेष सोयाबीन विकास कार्यक्रम

विदर्भातील शेतक-यांसाठी सोयाबीन पिक विकासासाठी हि योजना राबविल्या जाते. या अंतर्गत रोप सुरक्षा औषधी ५०% अनुदानाने पुरविल्या जाते तसेच थ्रेशर ५०% अनुदानाने.

 • ऊस विकास कार्यक्रम

हि योजना ऊस उत्पादकासाठी आहे. नांगर नीचे ट्रक्टर ५०% अनुदानाने प्रत्येक शेतक-यासाठी ३०,००० रुपये ३०-५० अश्वशक्ती चे ट्रक्टर घेण्यासाठी अनुदान.

वरील सर्व योजना पंचायत समिती द्वारा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत, राबविल्या जातात