जिल्हा कोषागार कार्यालय व तहसील स्तरावरील उप-कोषागार कार्यालये

जिल्हा कोषागार कार्यालय हे राज्य शासनाचे कार्यालय असून शासनाच्या जमेचे लेखे तयार करणे व सरकारचे भुगतान करणे हे काम करित असते. नियमानुसार वेगवेगळ्या अधिकृत अहरण व वितरण अधिका-यांना ठरवून दिलेल्या अंदाजपत्रकीय अनुदानाचे वाटप सुद्धा केले जाते. कोषागार कार्यालय राज्य शासनाच्या निवृत्त कर्माचा-यांचे पगार सद्धा करत असते . निरनिराळ्या कायद्याच्या अनुषंगाने लेखे महानिरीक्षकांच्या मदतीने कोषागार कार्यालय हे महत्वाचे ठरले आहे. कोशागार हे शासकीय यंत्रणा असल्यामुळे न्यायिक तिकिटे, राज्य लॉटरी सुद्धा या मार्फत विकल्या जाते. शासकीय लेख्यांची देखरेख व नंतर ते लेख महानिरीक्षकास पाठविणे अशी कामे सुद्धा कोषागार कार्यालय करीत असते.

 

जिल्हा कोषागार अधिकारी व त्या सोबत दोन अतिरिक्त कोषागार अधिकारी मिळून कार्यालयाचे काम पाहत असतात तहसील मुख्यालयात उप कोषागार अधिकारी हा कार्यालय प्रमुख असतो.

कार्यालय व पत्ता संपर्क क्रमांक
जिल्हा कोषागार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ ०७२३२-२४२९८४, २४२४९५
उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, आर्णी २६७०६९
उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, दारव्हा २५५५३६
उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, पुसद २४५८८०
उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, केळापूर २२७१७१
उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, उमरखेड २३८५२६
उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, वणी २२८४३७
उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, दिग्रस २२२०७८
उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, बाभूळगाव २४०४५८
उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, कळंब २२६६९४
उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, घाटंजी २२७८६६
उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, मारेगाव २३७३२४
उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, महागाव २२२२६९
उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, नेर २६७९५४
उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, राळेगाव २२५७३७
 

अशा प्रकारे सरकारी अनुदानाच्या जमा - खर्चाची देवाण-घेवाण करण्याचे काम जिल्हा कोषागार व १४ उप कोषागार कार्यालये करिता असतात. वरीस सर्व कार्यालये शासकीय इमारती मध्ये आहेत.

अधिकोषण (बँकिंग) व गैर अधिकोषण कोषागार कार्यालये

महारष्ट्र कोषागार नियम १९६८ अन्वये अधिकोषण कोषागार म्हणजे कोषागार ज्याचा रोखीचा व्यवसाय अधिकोषा (बँक) द्वारे होतो व गैर-अधिकोषण कोषागार म्हणजे अधिकोष कोषागार कार्यालया व्यतिरिक्त असलेले कोषागार.

अधिकोष कोषागार कार्यालयांची ठिकाणे

यवतमाळ, दारव्हा,केळापूर, पुसद, उमरखेड, वणी, दिग्रस, बाभूळगाव, घाटंजी व नेर.

गैर-अधिकोष कोषागार कार्यालयांची ठिकाणे

आर्णी, कळंब, मारेगाव, महागाव व राळेगाव

निवृत्ती वेतन भुगतान

निवृत्ती वेतन जिल्हा कोषागार कार्यालय मार्फत होते व त्याचे भुगतान स्टेट बँक ऑफ इंडिया वा इतर राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेमार्फत होते.

 

निवृत्ती वेतन धारकाला आपली ओळख दाखविण्यासाठी कोषागार अधिका-यासमोर यावे लागते तसेच महाराष्ट्र कोषागार कायदा १९६८ च्या नियम ३५६ नुसार त्या व्यक्तीला प्रत्येक वर्षीच्या १ नोव्हेंबर ला बँके मार्फत जीवित असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. अन्यथा डिसेंबर नंतरचे त्याचे निवृत्ती वेतन जीवित प्रमाणपत्र जमा करे पर्यंत थांबविल्या जातो.

 

कोणत्याही निवृत्ती वेतन मिळण्याच्या अडचणी बाबत काही गा-हाणे असल्यास, निवृत्ती वेतन धारकांनी जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

तिकिटांची विक्री व पुरवठा

वेगवेगळ्या प्रकारच्या तिकिटांची वेगवेगळ्या परवानगी करिता नागरिकांना गरज असते. महत्वाच्या खरेदी/विक्री साठी कागदपत्रांच्या नोंदणी करिता तिकिटांची गरज असते. कोर्ट फी तिकिटे न्यायालयीन प्रकरणामध्ये वेगवेगळ्या कामासाठी आवश्यक असतात. खालील प्रकारचे तिकिटे व पेपर्स जे नागरिकांना उपलब्द केल्या जातात:

 
  • कोर्ट फी तिकिटे
  • कोर्ट फी लेबल्स
  • सामान्य तिकिटे
  • विशिष्ट तिकिटे
  • रेवेन्यु तिकिटे
  • नोटरी तिकिटे

कोर्ट फी तिकिटे व कोर्ट फी लेबल्स हे अधिकृत विक्रेत्या मार्फत काही मर्यादे पर्यंत सुद्धा विकल्या जाते.

रेवेन्यु तिकिटे हे डाक घरांमध्ये तर नोटरी तिकिटे हे नोटरी कडे असते.

लेखे

कोषागार कार्यालय भुगतान बाबत चे लेख्यांचा दोन महिन्याला तर जमेचा हिशोब प्रत्येक महिन्याला लेखा महानिरीक्षांना देत असते.

इतर सखोल माहिती साठी वित्त विभागाचे संकेतस्थळ पाहता येईल.