स्व. श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्दकीय महाविद्यालय, यवतमाळ
स्थळ

स्व. श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्दकीय महाविद्यालयाची सुरुवात महाराष्ट्र शासनाने १९८९ साली केली. शहरी प्रदुषणा पासून कोसो दूर असलेल्या विदर्भाच्या डोंगराळ भाग असलेल्या यवतमाळ जिल्यात हे महाविद्यालय अत्यंत महत्वाचे ठरते आहे. यवतमाळ हे शहर नागपूर-तुळजापूर राज्य महामार्गाने जोडले गेले असून नागपूर हे शहर येथून साधारणतः १५० की.मी. दूर आहे. ४० की.मी. अंतरावर असलेले धामणगाव हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.

सोयी-सुविधा
 • श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्दकीय महाविद्यालय, यवतमाळ हे 5,१३,९६९ चौ.मी. क्षेत्रावर बांधलेले आहे.

 • प्रचंड असे बाह्यरुग्ण विभाग व आवश्यक उपकरणांनी सुसज्ज असे १२ शस्त्रक्रिया गृहे कार्यरत आहेत

 • २८८ खाटांचे भव्य रुग्णालय

 • २५२ खाटांचे जुने नागरी रुग्णालय

 • जुने महिलांचे रुग्णालय व क्षयरोग रुग्णालय संलग्न इमारतीत आहे

 • नवीन २८८ खाटांची विस्तारित इमारत बांधकाम सुरु आहे

 • ८०० आसन क्षमतेचे भव्य असे श्रोतृगृह

 • भरपूर पुस्तके व जर्नल्स युक्त प्रचंड वाचनालय

 • इंटरनेट सुविधा उपलब्द

 • आवासी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा उपलब्द

 • २४ तास आकस्मित सेवा व रक्तपेढी सेवा उपलब्द

प्रवेश क्षमता - १०० विद्दार्थी प्रती वर्ष एम.बी.बी.एस. करिता.
खाटांची संख्या - ५८४
शिक्षक कर्मचारी

अनुभवी व हुशार शिक्षकवृंद पूर्व चिकित्सालयीन व इतर चिकित्सा विभागा मध्ये उपलब्द. सर्व प्राध्यापक इतर विद्यापीठामधून स्नातकोत्तर शिक्षित

स्नातकोत्तर / पदवीत्तर सुविधा
नेत्रशास्त्र एम.एस. [नेत्र शास्त्र]
कान-नाक-घसा शास्त्र एम.एस. [कान-नाक-घसा शास्त्र]
बालरोग शास्त्र एम.डी. [बालरोग शास्त्र]
न्याय वैद्द्क शास्त्र एम.डी. [न्याय वैद्द्क शास्त्र]
सी.टी. स्कॅन सुविधा उपलब्द
अति दक्षता सुविधा

इतर सुविधा जसे लवचिक श्वसनीदर्शी, कृत्रिम श्वसन, आधुनिक जीव रासायनिक व सूक्ष्मजीव प्रयोगशाळा उपलब्द.