शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळ
पत्र पेटी क्र. २४, धामणगाव रोड, यवतमाळ पिन - ४४५००१
(07232)(कार्या.)43278,(निवास)42418 फॅक्स - :43278

शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ ची स्थापना सन १९६४ साली झाली. औद्दोगीकरणाच्या बाबतीत मागासलेल्या जिल्ह्यात हे महाविद्यालय उघडल्या गेल्या मुळे यास विशेष महत्व आहे. महाविद्यालया च्या अवतीभोवती शैक्षणिक वातावरण असल्यामुळे अभ्यासासाठी हे पूरक आहे.

सदर संस्था हि आधुनिक आधारभूत संरचनेनी सुसज्ज असून येथे विविध सोयी सुविधा आहेत जसे प्रशस्त इमारत, वाचनालय, संगणक प्रयोगशाळा, डेस्क-बेंचेस, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक गोष्टी इ..

उपलब्द अभ्यासक्रम
अभ्यासक्रमाचे नाव क्षमता कालावधी पात्रता
स्थापत्य अभियांत्रिकी ६० ३ वर्षे एस.एस.सी. (दहावी) किंवा तत्सम
विद्युत अभियांत्रिकी ६० ३ वर्षे एस.एस.सी. (दहावी) किंवा तत्सम
यांत्रिक अभियांत्रिकी ६० ३ वर्षे एस.एस.सी. (दहावी) किंवा तत्सम
रसायन अभियांत्रिकी ४० ३ वर्षे एस.एस.सी. (दहावी) किंवा तत्सम
कम्पूटर अप्लिकेशन मध्ये स्नातकोत्तर पदविका २० १-१/२ वर्षे (३ सेमिस्टर्स) अभियांत्रिकी व तंत्रज्ञान मधील कोणतीही ३ वर्षाची पदविका
एकूण २४०
संस्थेमधील उपलब्द सुविधा
वसतिगृहे मुलींकरिता सामुहिक खोल्या
जेवणावळ क्रीडांगण
पोस्ट ऑफीस बाग
उपहारगृह सभागृह
वाचनालय शैक्षणिक साहित्य वाचन केंद्र
सामुदायिक तंत्रज्ञान

सामुहिक तंत्रज्ञानाची हि योजना या संस्थेमध्ये १९८६ साली भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास विभागा मार्फत सुरु करण्यात आली. सदर शासकीय तंत्रनिकेतन संस्था अशी महाराष्ट्रातील एकमेव असून भारत सरकार ने या करिता डी.सी.ए. अनुदान सुरु केले आहे. तेंव्हा पासून या तंत्रनिकेतनने ग्रामीण भागातील नागरिकांच्या पुनारूथाना करिता व खालील गोष्टींची पूर्तता करण्यासाठी अथक परिश्रम केले आहे.

  • मनुष्यबळ विकास

  • तंत्रज्ञानाचे विकेंद्रीकरण

  • तांत्रिक मदत सेवा

  • सामुदायिक सेवा

संगणक केंद्र

या संस्थेमध्ये सुसज्य अशी संगणक प्रयोगशाळा असून त्या द्वारे विद्यार्ध्याना प्रशिक्षण देण्यास मदत होते. तसेच संस्थेतील कर्मचारी व नागरिकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यासाठी याची मदत होते.

औद्दोगिक संस्थेशी संपर्क

जागतिक बँकेच्या सहायता प्रकल्पा अंतर्गत या संस्थेमध्ये औद्दोगिक संस्थेशी संपर्क केंद्राची सुरुवात करण्यात आली असून त्यामध्ये आवश्यक प्रशिक्षण तथा नौकरी संदर्भातील मार्गदर्शकाची यात नेमणूक केली आहे