शासकीय औद्दोगिक प्रशिक्षण केंद्र
धामणगाव रोड, यवतमाळ (महा.) - ४४५००१
(०७२३२) - २४३१०८)

कारागीर प्रशिक्षण योजने अंतर्गत, औद्दोकिक प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करण्यात आली असून राज्यातील सर्व जिल्ह्यात याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

योजनेचे उद्देश

 • माध्यमिक शिक्षण स्तरां पर्यंत शिकलेल्या युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे. (दहावी उत्तीर्ण वा आठवा वर्ग उत्तीर्ण) आणि त्यांना रोजगार मिळविण्यासाठी तयार करणे किंवा स्वयं रोजगारासाठी प्रोत्साहित करणे जेणे करून शिक्षित तरुणांमधली बेरोजगारी कमी करता येईल.

 • औद्दोगीकरण आणण्यासाठी कुशल कामगारांचा ओघ टिकविणे जेणे करुण उद्दोग वाढी साठी गती मिळेल.

 • व्यवस्थितरित्या युवकांना व्यावसाईक प्रशिक्षण देऊन वस्तूंची उत्पादकता व गुणवत्ता वाढविणे.

कारागीर प्रशिक्षण योजना हा प्रशिक्षण कार्यक्रम असून राष्ट्रीय स्तरापर्यंत याची आमल बजावणी झाली आहे. तसेच याची देखरेख भारत सरकारच्या कामगार मंत्रालया अंतर्गत असलेल्या महासंचालक, रोजगार व प्रशिक्षण यांच्या अखत्यारीत येते.

औद्दोगिक प्रशिक्षण केंद्रात शिकविण्यात येत असलेले विविध अभ्यासक्रम हे प्रात्यक्षिकावर भर देणारे असून यात अभियांत्रिकी, चित्रकलेचे ज्ञान, कार्यशाळा विज्ञान, गणितीय ज्ञान, सामाजिक विज्ञान, उद्योजकता प्रशिक्षण इत्यादी बाबत प्रशिक्षण देण्यात येते. या व्यतिरिक्त स्वयंरोजगारासाठी चालना मिळण्यासाठी इतर गोष्टी सुधा शिकविल्या जातात ज्यामुळे प्रशिक्षणार्थी चा विकास होण्यास मदत होते.

संस्थेचे नाव स्थापनेचे वर्ष संपर्क क्रमांक
औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ १९६३ 243108
औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, वणी १९८४ 225246
औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, उमरखेड १९८४ 237263
औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, गुंज १९८४
औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, पुसद १९९५ 247629
औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, घाटंजी १९९५ 227323
औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, दिग्रस १९९७ 222736
औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, बाभूळगाव १९९७ 255435
औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, झरी जामणी १९९९
औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, दारव्हा १९९९
औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, नेर (आदिवासी क्षेत्र अंतर्गत) १९९९
औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, पांढरकवडा १९८४ 2215072
औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, आर्णी १९९६ 266032
औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, कळंब १९९७ 226330
औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, राळेगाव १९९७
औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, मारेगाव (अशासकीय) १९९७ 226360
शाहू महाराज औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, वणी १९९२ 225404
छत्रपती शाहू महाराज औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, मारेगाव १९९२ 226419
अल्पसत्र (३ महिने) स्वयंरोजगार अभ्यासक्रम
व्यावसाईक अभ्यासक्रम यवतमाळ पांढरकवडा एकूण
संगणक चालक २० -- २०
छायाचित्रण २० -- २०
वेळू कला कामगार २० -- २०
सिंचन पंप यांत्रिक -- २० २०
वाहन चालक -- २० २०
एकूण ६० ४० १००
शिक्षुता प्रशिक्षण योजना (बीटीआरआई)

शिकाऊ व्यक्ती बाबतच्या कायद्याचा उद्देश हा आहे की उद्दोग धंद्या करिता प्रशिक्षण देणे हा कायदा १९६१ मध्ये लोकसभेने पारित केला व त्यात १९७३ मध्ये दुरुस्ती केली. त्यानंतर राज्यांमध्ये हि योजना १९६३ मध्ये लागू करण्यासाठी काही नियम ठरविले गेले. या योजने अंतर्गत भारत सरकारने काही उद्दोगधंदे व व्यवसाय निवडले जे की या कायद्या अंतर्गत येतात. त्याच बरोबर काही कुशल गट यात अंतर्भूत करून नवीन असे अभ्यासक्रम तयार केले जे की उद्दोग धंद्या साठी पूरक ठरू शकतील. कारखान्यांना सुद्धा काही ठरवून दिलेल्या प्रमाणात अशा शिकाऊ उमेदवारांना कुशल कामावर ठेवणे बंधनकारक केले. शिकवू उमेदवारांना एक वर्षाचे प्राथमिक प्रशिक्षण शासकीय केंद्रावर (व्यवसायिक प्रशिक्षण केंद्र) घ्यावे लागेल व नंतर राहिलेल्या २ वर्षाच्या काळापासून प्रात्यक्षिक प्रशिक्षण हे वेगवेगळ्या स्थापित कारखान्यात घ्यावे लागेल व तेथील कामगारा सोबत काम करावे लागेल. पाठ्य पुस्तका बाबतचे प्रशिक्षण हे शक्यतो शासकीय प्राथमिक प्रशिक्षण केंद्रात शासकीय मदतीने मिळेल. हि योजना वेगवेगळ्या उद्दोग धंद्यांना आवश्यक असलेले कुशल कामगार तयार करण्यासाठी पूरक ठरते.

विभागाचे महत्वाचे कार्य हे की शिकाऊ व्यक्ती बाबतच्या कायदा १९६१ अन्वये खाजगी उद्दोग धंद्यामधील व राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या उद्दोग धंद्या साठी नियंत्रित व सुरळीत प्रशिक्षण देणे होय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालक हे सुद्धा हि योजना राबविण्यासाठी राज्य शासनाचे शिकाऊ उमेदवारा करिता मार्गदर्शक आहेत.

माध्यमिक स्तरावरील व्यावसायिक शिक्षण
ज्या विद्यार्थ्याने तांत्रिक विषय घेऊन दहावी ची परीक्षा उत्तीर्ण केली असेल त्याला खालील लाभ मिळू शकतात.
 • २५% टक्के तंत्रनिकेतन प्रवेशा करिता राखीव जागा.

 • ४०% टक्के ११ वी (तांत्रिक/व्यावसायिक) प्रवेशा करिता राखीव जागा

 • २५% टक्के व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात प्रवेशा करिता राखीव जागा

 • यांत्रिक देखरेख (मेकॅनिकल मेंटेनन्स)

 • विद्दुत उपकरणे देखरेख (इलेक्ट्रीकल मेंटेनन्स)

 • स्कूटर व मोटर सायकल देखभाल दुरुस्ती

 • सामान्य स्थापत्य अभियांत्रिकी

 • इलेक्ट्रॉनिकस

शासकीय व अशासकीय व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात +२ अभ्यासक्रम निहाय जागा (क्षमता)
संस्थेचे नाव अभ्यासक्रम क्षमता स्थापना वर्ष संपर्क क्रमांक
शासकीय तंत्र महाविद्यालय यवतमाळ विद्दुत उपकरणे देखरेख (इलेक्ट्रीकल मेंटेनन्स) ५० १९८२-८३ २४४२५२
यांत्रिक देखरेख (मेकॅनिकल मेंटेनन्स) २५
स्कूटर व मोटर सायकल देखभाल दुरुस्ती २५
अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ विद्दुत उपकरणे देखरेख (इलेक्ट्रीकल मेंटेनन्स) ५० १९८१-८२ २४५१७९
सामान्य स्थापत्य अभियांत्रिकी २५
स्कूटर व मोटर सायकल देखभाल दुरुस्ती २५
इलेक्ट्रॉनिकस तंत्रज्ञान
प्रमाणपत्र अभ्यासक्रम (लघु सत्र))

अशा अभ्याक्रमाचा कालावधी हा ६ महिने ते दोन वर्षे आहे. व्यावसायिक परीक्षा मंडळ हे अंतिम परीक्षा घेते व यशस्वी विद्यार्थ्यांना अभ्याक्रम प्रमाणपत्र वितरीत करते. हे अभ्यासक्रम मुख्यत्वे अशाच विद्यार्थ्यांसाठी आखलेले आहेत की ज्यांचे शालेय शिक्षण कमी आहे परंतु तो वेगवेगळ्या विषया बद्दलची स्थानिक गरज पूर्ण करू शकतो. जो विद्यार्थी हे अभ्यासक्रम पूर्ण करतो तो विशिष्ठ विषयाचे कुशल ज्ञान मिळवितो व अल्प गुंतवणूक करून लघु उद्दोग उभारण्यास पात्र ठरतो अशा रीतीने तो व्यवसाय करण्यास आदर्श बनतो. यशस्वी उमेदवार हा मध्यम व लघु-उद्दोगा मध्ये काम करण्यास पात्र ठरतो.

वरील नमूद अभ्यासक्रमा व्यतिरिक्त शिवणकला अभ्यासक्रम सुद्धा संचालनालया मार्फत घेतल्या जातो. विशेष करून महिला उमेदवार या प्रशिक्षणाचा अधिक लाभ घेतात. वरील सर्व व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रम हे व्यावसायिक परीक्षा मंडळा मार्फत मान्यता प्राप्त असून उप संचालक, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण यांचे मार्फत अशासकीय शैक्षणिक संस्थाना सदर अभ्याक्रम ठरवून दिलेल्या नियम व अटीनुसार सुरु करण्याबाबत परवानगी दिली जाते.

शासकीय व अशासकीय व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात लघु सत्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम करिता अभ्यासक्रम निहाय जागा (क्षमता):
अ) शासकीय
अभ्यासक्रम कालावधी क्षमता
शासकीय व्यावसायिक रंगकाम ६ महिने २०
संधाता (वेल्डर) ६ महिने ४०
संगणक चालक ६ महिने ४०
विद्दुत कुंडलन (इलेक्ट्रिक वायंडिंग) ६ महिने २०
एकूण १२०
ब) अशासकीय
अभ्यासक्रम कालावधी क्षमता
स्थापत्य आरेखक (सिविल ड्राफ्ट्समन) २ वर्षे ४०
शिवणकला व कटाई १ वर्ष ४०
सौंदर्य कला (ब्युटी पार्लर) १ वर्ष १८०
एल.इ. व आर एस. १ वर्ष १५
काम्पोसिंग, प्रिंटींग व बायंडिंग १ वर्ष २५
एम्ब्रायडरी १ वर्ष २५
छायाचित्रण १ वर्ष २५
ऑटो इलेक्ट्रिसियन ६ महिने २५
मोटर आर्मेचर री-वायंडिंग ६ महिने ९०
इलेक्ट्रिक वायरमन ६ महिने १७५
संगणक प्रोग्रामिंग ६ महिने ५००
डीटीपी ६ महिने १४५
सीसीए ६ महिने २००
सिसिसिओ (एमएस-ऑफिस सहित) ६ महिने १०७०
एकूण ३०९८
अ+ब ३११८