बळीराजा चेतना अभियान
  
      
    काही ठळक माहिती
 अभियान माहितीपट  संग्रहित वृत्तांकने

आत्महत्येत घट होण्यास अभियानाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , स्टॉलला भेट देऊन जाणून घेतली उपक्रमांची माहिती

  

अभियानाच्या बाजारातून सिताफळाची विक्री हक्काची जागा मिळाली : शेतक-यांना शेतमाल विक्री करण्यावचे आवाहन

  

सैन्यात भरती व्हा, भूमातेचे पांग फेडा, अभियानाचे चेतनादूत रामराव राऊत यांचे दिग्रस तालुक्यात प्रबोधन

  

शेतक-यांना युवाशक्ती चा आधार : शाळा महाविद्यालयातून अभियानाची जनजागृती

                    

दि. ३१: जिल्हयात राबविण्यात येत असलेल्या बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून शेतक-यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी अनेक उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. शेतक-यांना तातडीची मदत गावातच मिळत आहे. या अभियानामुळे जिल्हयामध्ये परिवर्तनाला सुरवात झाली असून शेतकऱ्यांच्या आत्महत्येत अभियानामुळे लक्षणिय घट झाली असल्याने जिल्‍हा प्रशासनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशंसा केली. ते कळंब येथे आयोजित मुख्यमंत्री.......

  

दि. ३१: बाभूळगाव तालुक्यातील गणोरी येथील शरद उत्तरवार यांनी लागवड केलेल्या सिताफळ विक्रीला बळीराजा चेतना अभियानाच्या थेट शेतमाल विक्री बाजारात हक्काची जागा मिळाली. बाजारात लावत असलेल्या स्टॉलमुळे सिताफळाची विक्री बघता बघता होत असल्याने नफाही चांगला मिळत आहे. त्यामुळे जिल्हयातील अशाच शेतक-यांनी आपला शेतमाल, फळपिके, धान्य अभियानाच्या बाजारात विक्रीसाठी आणावे असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन्द्र.........

  

दि. ३०: आपण भूमातेचे लेकरे असून या मातेचे पांग फेडण्याची संधी आपल्या‍ला सैन्य भरतीतून लाभली आहे. त्या मुळे युवकांनी या भरतीमध्ये सहभागी व्हावे. यासाठी बळीराजा चेतना अभियानाचे चेतनादूत प्रबोधनकार रामराव राऊत, दिग्रस युवकांना प्रबोधन करण्याचे काम करीत आहेत. त्यांनी तालुक्यातील महाविद्यालये व ७० च्या वर गावात प्रबोधन आणि मार्गदर्शन केले आहे. नुकतेच त्यांचा निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या हस्ते.........

  

दि. २६: जिल्हयातील शेतक-यांत बदल घडवून आणण्याची शक्ती केवळ युवकांमध्ये आहे. त्या‍मुळे जिल्हयातील शेतकरी विविध अडचणींना तोंड देत असताना त्यांना आधार दिला पाहिजे. प्रसंगी शेतक-यांचे प्रश्न समजून त्यावर विद्यार्थ्यांनीच सोडविण्या‍साठी पुढाकार घेतला पाहिजे. असे आवाहन बळीराजा चेतना अभियानाचे समुह संघटक प्रकाश बहादे यांनी केले. अभियानांतर्गत कला व वाणिज्य महाविद्यालय बोरीअरब, स्व. गोविंदराव पाटील शिक्षण.........

.......सविस्तर वृत्त

  

.......सविस्तर वृत्त

  

.......सविस्तर वृत्त

  

.......सविस्तर वृत्त

                    

विद्यार्थ्यांनो शेतकरी हिताचा निर्धार करा : गावातील शेतक-यांना मदत करण्याचे आवाहन

  

शिक्षकांना रोखरहित व्यवहाराचे प्रशिक्षण

  

महा ई-सेवा केंद्रांतून रोखरहित व्यवहार करावा : जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह

  

बळीराजाची परिस्थिती बदलविण्याचे सामर्थ्यं विद्यार्थ्यांत : जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह

                    

दि. २६: शेतक-यांना आधाराची गरज असून आपल्या पाल्यांनी दिलेला आधार हा लाख मोखाचा वाटतो. हाच उद्देश डोळयासमोर ठेऊन बळीराजा चेतना अभियानांअर्तगत श्री. शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यवतमाळ, मातोश्री नानीबाई घारफळकर विज्ञान महाविद्यालय बाभूळगाव, शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय बाभूळगाव येथील विद्यार्थ्यांना अभियानाची माहिती व मार्गदर्शन विषयक कार्यशाळा पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांना आले..........

  

दि. २१ : ५०० आणि १००० रुपयांचे चलन बंद झाल्यानंतर रोखरहित अर्थव्यवस्था अंगीकारावी यासाठी प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या मुख्यध्यापक व शिक्षकांना रोखरहित व्यवहारांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन मध्ये नुकतेच देण्यात आले. यातून ५ ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ई-बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएम इत्यादीं मार्फत रोखरहित व्यवहार कसा करायचा यांची माहिती शिक्षक आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना देणार आहे........

  

दि. २१ : जिल्ह्यातील ग्रामीण भागात २५४ महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून रोखरहित व्यवहाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात यासाठी महा ई-सेवा केंद्राचे केंद्रचालकांना रोखरहित व्यवहार करण्यासाठी रोखरहित व्यवहारांच्या पाच प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ग्रामीण भागातील नागरिकाकडे उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग करून व्यवहार करण्याबाबत माहिती देण्यात यावी,..........

  

दि. २०: आई-वडील कठिण परिस्थितीत आपल्या मुलांना शिक्षण देतात. याची जाण प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. चांगले शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाची स्थिती बदलली पाहिजे. आणि याचे सामर्थ्य केवळ विद्यार्थ्यांत आहे. असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी विद्यार्थ्यांना केले. मंगळवार दि. २० डिसेंबर रोजी लोकनायक बापूजी अणे महिला विद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, लोकमान्य टिळक.........

.......सविस्तर वृत्त

  

.......सविस्तर वृत्त

  

.......सविस्तर वृत्त

  

.......सविस्तर वृत्त

  यशोगाथा बळीराजाची

  आधुनिक शेतीची कास धरली; शेतात प्रगती साधली !

  कोरडवाहू बळीराजा बनला उद्दोजक; दालमिलचा व्यवसाय ठरला प्रगतीचा मार्ग

  फळबागेला दिली आंतरपिकाची जोड

  आंतर पिकातून साधली प्रगती

  मुरमाड जमिनीची किमया न्यारी; वर्षाला लाखांचे उत्पन्न दारी !