रोखरहित महाराष्ट्र....रोखरहित जिल्हा   
  
     महत्वपूर्ण माहिती   
  
  नेट बँकिंग
 • काय आहे - इंटरनेट वर लॉगीन करून व्यवहार शक्य
 • व्यवहार - आय एम पी एस , एन एफ टी , आर टी जी एस या तीन प्रकारच्या व्यवहारासाठी पर्याय. आर टी जी एस सकाळी ८ ते दुपारी ४:३० पर्यत तर एन एफ टी सकाळी ८ ते संध्या. ६:३० पर्यत करता येतात. आय एम पी एस सेवा २४ तास उपलब्ध.
 • विशेष - आर टी जी एस अधिक रकमेच्या व्यवहारासाठी उपयुक्त तर आय एम पी एस त्वरित व्यवहारासाठी
 • मर्यादा - आर टी जी एस २-१० लाख, एन एफ टी १० लाख, तर आय एम पी एस २ लाख रोज
 • शुल्क - रु. २.५० ते १% प्रती व्यवहार
  
  
  कार्ड (क्रेडीट / डेबिट)
 • काय आहे -पैसे काढण्यापासून तर वस्तूंची खरेदी (ऑनलाईन सुद्धा) २४ तास करता येते
 • वैशिष्ट्य - रोख रक्कम बाळगण्या पासून मुक्तता
 • आवश्यकता - स्वाईप मध्ये पिन नंबर, तर ऑनलाईन पेमेंट मध्ये कार्ड नंबर, सिवीवी क्रमांक व मुदत दिनांक
 • मर्यादा - डेबिट कार्ड बाबत बँके नुसार तर क्रेडीट कार्ड उत्पन्न व वापरावर आधारित
 • शुल्क - निशुल्क (मर्चंट मार्फत काही रक्कम वसूल केल्या जाते)
  
  
  यू पी आय
 • काय आहे - पेमेंट इंटरफेस आहे. बँकेच्या अॅप नुसार काम करते
 • व्यवहार - २४ तास व्यवहार करता येते
 • वैशिष्ट्य - ईमेल प्रमाणे सोपा. फक्त एका आय डी ने रक्कम पाठविता येते. खाते क्रमांक वा आय एफ एस सी क्रमांकाची आवश्यकता नाही.
 • आवश्यकता - या करिता व्हर्चुअल अड्रेस आवश्यक
 • मर्यादा - कमाल १ लाख रुपये प्रती व्यवहार शक्य
 • शुल्क - निशुल्क
  
  
  रोख कार्ड
 • काय आहे - एक प्रकारचे प्रेपेड कार्ड ज्याला रिचार्ज केल्या जाऊ शकते. किवा फक्त एकदा रक्कम टाकण्या साठी सुद्धा वावरता येते.
 • व्यवहार - सेवा आठवड्यातील २४ तास सुरु. त्वरित स्वाईप करता येते
 • वैशिष्ट्य - सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बँक खाते नसतानाही वापरता येते. बँक लिंक्ड कार्ड चा वापर डेबिट कार्ड सारखा केला जाऊ शकतो.
 • आवश्यकता - वापरासाठी स्वाईप यंत्र आवश्यक
 • मर्यादा - ५० हजार ते १ लाख रुपये
 • शुल्क - निशुल्क
  
  
  ई-वॉलेट
 • काय आहे - खिश्यात रक्कम ठेवण्या प्रमाणे अॅप च्या मदतीने मोबाईल मध्ये पैसे ठेवता येते.
 • व्यवहार - आय एम पी एस, मोबाईल च्या माध्यमाने कधीही पैशाची देवाण शक्य. सर्वात सोपी पद्धत
 • वैशिष्ट्य - सर्वात सुरक्षित व छोट्या देवाण साठी उपयुक्त पर्याय
 • आवश्यकता - लॉगीन करूनच व्यवहार. पे टी एम मध्ये पुढच्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक आवश्यक
 • शुल्क - निशुल्क (बँक खात्यात रक्कम पाठविल्यास शुल्क लागू)
  
  
  यू एस एस डी
 • काय आहे - वापरासाठी साध्या फोन वरून *99# क्रमांक डायल करावा लागतो
 • व्यवहार - ग्रामीण क्षेत्रात वापरासाठी अत्यंत उपयुक्त
 • आवश्यकता - आर एम – पिन वा आधार वा खाते क्रमांक चा पर्याय वापरून पेमेंट करता येते.
 • मर्यादा - पाच हजार रुपये प्रती व्यवहार
 • शुल्क - ०.५० रुपये (किवा मोबाईल सेवा देणा-या संस्थेनुसार)