कृषी व पिके
 
खरीप पिके

ज्वारी, कापूस, भुईमुग व भात हि जिल्ह्यात घेतल्या जाणारी प्रमुख पिके होत.

  • ज्वारी – ज्वारी हे पिक जिल्ह्यातील पुसद, नेर, महागाव, उमरखेड, मारेगाव, घाटंजी, वणी, झरी जामणी इत्यादी तालुक्यात घेतल्या जाते.

  • कापूस – घाटंजी, वणी, पुसद, उमरखेड, महागाव व नेर हि कापूस उत्पादक प्रमुख तालुके आहेत.

  • भुईमुग - भुईमुगाचे उत्पादन सर्वाधिक पुसद, दिग्रस, दारव्हा, आर्णी व घाटंजी तालुक्यात होते.

रब्बी पिके

गहू व हरभरा हि रब्बी हंगामामध्ये प्रामुख्याने घेतली जाणारी पिके आहेत तसेच या पिकाबरोबर जवस सुद्धा अंतरपीक म्हणून घेतल्या जाते.

  • गहू – मुख्यत्वे वर्धा व पैनगंगा नदीच्या खो-यात वसलेल्या तालुक्यामध्ये गव्हाचे पिक घेतल्या जाते. जसे उमरखेड, पुसद, वणी, दिग्रस, मारेगाव व झरी जामणी हे गव्हाचे पिक घेणारे मुख्य तालुके असून आर्णी घाटंजी व यवतमाळ तालुक्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात गव्हाचे उत्पन्न होते.

  • हरभरा (चना) – हरभ-याचे पिक उमरखेड, वणी, राळेगाव, मारेगाव, पुसद,दिग्रस, घाटंजी व बाभूळगाव तालुक्यात मुख्यत्वे घेतले जाते.

सिंचनावर आधारित पिके

ऊस, केळी, संत्री, द्राक्षे व खाण्याची पाने हि प्रामुख्याने सिंचनावर आधारित जिल्यात घेतली जाणारी पिके होत.

  • ऊस – ऊसाचे उत्पादन पुसद, उमरखेड व महागाव तालुक्यात काही प्रमाणात घेतल्या जाते.

  • केळी व संत्री – झाडगाव, राळेगाव, कळंब व दाभा-पहूर (बाभूळगाव) परिसरात केळी व ऊस पहावयास मिळते.

  • द्राक्षे – पुसद व उमरखेड परिसरात द्रक्ष्याच्या बागा दिसून येतात.

  • खाण्याची (नागवेल) पाने - लालखेड,दारव्हा दिग्रस व उमरखेड क्षेत्रात खाण्याच्या पानांचे मळे पहावयास मिळतात.